"एक एकांत"
"एक एकांत"
एक एकांत फारच शांत
एक एकांत धडधड वाढवी उरात
नजर दुरवर पाहते तुझी वाट
आता तरी येशील होईल आपली गाठ
एक एकांत वाढवी व्याकुळता
एक एकांतात अनेक विचार तुझे मनात
चाहूल लागावी तुझ्या येण्याची
आस आहे तुला मन भरून पाहण्याची
एक एकांत हवी आहे तुझी साथ
एक एकांत हवा तुझाच हातात हात
असा हा एकांत मैफिल होऊ दे
आनंदाचा झरा माझ्या मनी वाहू दे
......संध्या गडगे-सिन्नरकर
Comments
Post a Comment