Posts

Sandhya's Poem

अन् नकळत आपण घडतच असतो....

अन् नकळत आपण घडतच असतो.... आयुष्याच्या खडतर वाटेवर  चालता चालता पडलो जरी  खंबीर करून स्वतःला उठायचे असते  स्वप्नांचा पाठलाग करणे मात्र सोडायचे नसते  अन् नकळत आपण घडतच असतो....  काळोखमय पाऊल वाटेवरती पाय डगमगत असतात   हो ....आज ना उद्या यश मिळेल म्हणून पुढचे  पाऊल टाकायचे  असते   अन् नकळत आपण घडतच असतो....  दुःखाच्या वेळी मनातून आपण खचत असतो  आपले कोण अन्  परके कोण  फरक उमजत असतो  साथ मोलाची ती संकट काळातील  जाणीव ठेऊन आपल्यांची स्वतःला घडवायचे असते  अन् नकळत आपण घडतच असतो.... आली जरी संकटे हजार मानायची नसते  कधीही हार धाडसाने आलेल्या संकटांना सामोरे जायचे असते  संकटांना हरवून स्वतःला जिंकवण्यासाठी लढायचे असते  अन् नकळत आपण घडतच असतो....  यश कधी मिळो न मिळो  खचून जायचे नसते  नाही जिंकलो तरीही चालेल  उत्तम मार्गदर्शक नक्कीच बनायचे असते  अन् नकळत आपण घडतच असतो....  खंत नक्कीच पडेल एक दिवस दुःखाला  सुख येईल अलगद चालून आपल्याही वाटेला  आल्या वाटेने जाईल परतुनी  स्वप्ननांसाठीची अतोनात धडपड पाहूनी अन् नकळत आपण घडतच असतो....  दुःखाची सायंकाळ झाल्यावर समजते आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा पाठशिवणीचा

" लेक "

" लेक "  हो ना ती लेक असते ........... जन्माला  येऊन आयुष्य  सुगंधित  करणारी ती लेकच असते ............. तिचे टुमदार डोळे आणि  चेहऱ्यावरचे पहिले निरागस हसू बघून  सगळ्या वेदना विसरायला लावणारी  ती लेक असते ........... जेव्हा ती लुटूलुटू चालायला लागते ना  तिच्या छुमछुम पैंजणांनी  घराला  घरपण आणणारी  ती लेक असते.......... जेव्हा हळू हळू ती बोलू लागते  आणि पहिल्यांदा आई  म्हणते  ना  तेव्हा मायेचा भावनांना बहरून  आणणारी  ती लेक  असते ............ जशी  ती मोठी होऊ लागते  तिची आणि  माझी  गट्टी होते  आई आणि लेकीच्या नात्याला मैत्रीत रूपांतर करणारी  ती  लेक असते ........ चढाओढीच्या जीवनात  जेव्हा दुःख असहय्य  होते ना  त्या दुःखांना  नकळत  सुखात  बदलवणारी  ती  लेक असते ......... काळोखमय पाऊलवाटेचा दिवा असते  कोरडवाहू आयुष्याचा  निखळता झरा  असते  आसवांनी  घागरीगत  भरलेल्या  डोळ्यांमध्ये  क्षणात  हसू आणणारी  ती  लेक  असते .......... वैतागलेल्या  आयुष्याचा अंकुर असते  संपलेल्या  प्रत्येक आशेचा किरण असते  जिच्या  सहवास आणि निखळ हस्याने  नव्याने  आयुष्य  फुलवणारी  ती लेक असते ...............

"एक एकांत"

 "एक  एकांत"  एक एकांत  फारच शांत  एक   एकांत  धडधड  वाढवी उरात  नजर  दुरवर  पाहते तुझी वाट  आता  तरी येशील होईल आपली गाठ  एक एकांत वाढवी व्याकुळता  एक एकांतात अनेक विचार तुझे मनात  चाहूल लागावी तुझ्या येण्याची  आस आहे तुला मन भरून पाहण्याची  एक एकांत हवी आहे तुझी साथ  एक एकांत हवा तुझाच हातात हात  असा हा  एकांत मैफिल होऊ दे  आनंदाचा झरा माझ्या मनी वाहू दे             ......संध्या गडगे-सिन्नरकर 

"वेळ "

        "वेळ " बघाना  वेळेलाही  किती  रूपे  असतात  प्रत्येक  गोष्टी  साठी  वेळकाळ  ठरलेलेच  असतात  वेळ  कधी येते  सुखाच्या  रूपात  तर  कधी  येते  दुःखाच्या  रूपात  असलं  जरी  वेळेचं  महत्त्व  आयुष्यात  तरीही  वेळेच्या  म्हणण्यानेच  सगळ्या गोष्टी  घडतात  कोणती  वेळ  कधी  येईल सांगुनी  थोडीशी  साथ  असतेच नशिबाची  म्हणुनी  आपण  कितीही  जरी  कष्ट  केले  वेळच  देते  त्याचे  फळ  ते  सारे  थांबत  नाही  वेळ  कधीही  कोणासाठी  म्हणूनच  बंधन  तिला नसतं  कोणाचही  निघून  गेलेली  वेळ  देते फक्त आठवणी  रंगी-बेरंगी अन्  निरनिराळ्या  साठवणी              ---------संध्या  गडगे - सिन्नरकर 

"वाढदिवस लेकीचा - देवश्रीचा " Poem dedicated to my beloved daughter on her birthday......

"वाढदिवस लेकीचा - देवश्रीचा " लिहीली  कविता  जिच्यासाठी  ती आमची  लाडाची  लेक  आज तिचा  वाढदिवस  सोनुली आमची  लाखात  एक  बरे  नसले  कधी  मला  तर जीव  लावतेस  असा  करून  देतेस  आठवण  आईची  मनात  उमटवतेस  मायेचा  ठसा  डोक्यावरून  फिरवतेस  मग  तुझे  नाजूक  इवलेसे  नाजूक  हात  मनातून उफाळून  येतात भावना  बाळा, तुला  भरभरून  आशीर्वाद  गातेस  मग  अंगाई  गीत  जशी  मी  तुझ्यासाठी  म्हणायची  यावी  ताकद  तुझ्या  अंगी  बाळा  पेलन्या  आव्हाने  पुढच्या  आयुष्याची  आजच्या  दिवशी  तू  सुखाचा  वर्षाव  घेऊन  आली   खूप भाग्यवान  झालो  आम्ही  बाळा, आयुष्यात  तू  आली  देवश्री , तुझ्या  चेहऱ्यावरचे  हस्य  असेच राहू दे ........  असाच  आमच्या  जीवनाला  अर्थ  येऊ  दे .........               .........संध्या  गडगे -सिन्नरकर 

"स्रीत्व "

"स्रीत्व " नारी  तू , भारी  तू  अन्  जगाची  उद्धारी  तू    आई  तू , ताई  तू  अन्  प्रत्येक  नात्याला  आधार  तू    मान  तू , शान  तू  अन्  तुझ्या  अस्तित्वाचा  अभिमान  तू    घराच्या  उंबरठ्याची  शान तू  अन्  अंगणाचे  पैंजण  तू    आदिमाया  तू, जगतजननी  तू  स्वराज्याचे स्वप्न  सत्यात  उतरावणारी  तू    गगनभरारी  तू, विज्ञान तू  विविध  कलांचा  आविष्कार तू    हारलीस  तरीही  जिंकशील  तू  पुन्हा  मैदानात  उतरशील  तू    पडलीस  तरीही  उठशील  तू  कंबर  कसून  झुंजशील  तू    झाल्या  वेदना  सोसशील  तू  पुन्हा  नव्याने  जगशील तू.....!           ------ संध्या  गडगे -सिन्नरकर   

"झळ "

"झळ " भर उन्हात पालवी  फुटते  त्या  झाडांना  म्हणावं  तरी  काय ? रखरखत्या  उन्हात  सावली  देतात  जशी  काळजी  घेते  आपली  माय  स्वतः  उन्हात  उभे  राहून  देतात  सर्वांना  सावली  उन्हाच्या  त्या  झळा  सोसत  जशी  राबते  आपली माउली  सावलीचा  त्या  आधार  घेता  मिळतो कसा  थंडावा  आईच्या  कुशीत  जाता  मिळतो जसा गारवा  हिरव्यागार  त्या झाडांशी  जसे  खेळतात  गार  वारे  इवल्याश्या  त्या  पिल्लांची  जशी  काळजी  घेतात  पाखरे  प्रखर  त्या किरणांमधे झाडे  राहतात  उभी  खंबीर  चढाओढीच्या  ह्या  जीवनात  जसा आई देते धीर  सारे  काही  सहन करून  जशी फुलतात  फुले  कळीरूप  जीवन  फुलवायचे  कसे   हे  तिच्याकडूनच  कळले.                                  ------ संध्या  गडगे -सिन्नरकर