"स्रीत्व "
"स्रीत्व "
नारी तू , भारी तू
अन् जगाची उद्धारी तू
आई तू , ताई तू
अन् प्रत्येक नात्याला आधार तू
मान तू , शान तू
अन् तुझ्या अस्तित्वाचा अभिमान तू
घराच्या उंबरठ्याची शान तू
अन् अंगणाचे पैंजण तू
आदिमाया तू, जगतजननी तू
स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरावणारी तू
गगनभरारी तू, विज्ञान तू
विविध कलांचा आविष्कार तू
हारलीस तरीही जिंकशील तू
पुन्हा मैदानात उतरशील तू
पडलीस तरीही उठशील तू
कंबर कसून झुंजशील तू
झाल्या वेदना सोसशील तू
पुन्हा नव्याने जगशील तू.....!
------ संध्या गडगे -सिन्नरकर
Comments
Post a Comment