आधार
आधार खोड, फांदया , फळे अन फुले आकार केवढा हा वृक्षाचा बीज हे मात्र एकच असतं आधार या सर्वांचा नात्या - नात्यांतून राहतात उभ्या चार भिंती पण भिंतींना आधार असते घरातील मोठी व्यक्ती नदया - नाले वाहतात घेऊन किरण आशेचा अन विशाल समुद्र बनतो आधार या सर्वांचा असला जरीही आपल्याला आधार सर्वांच्या प्रेमाचा सगळ्यात वेगळा आधार असतो फक्त मायेचा रंगी - बेरंगी नात्यांनी बनतो धागा आयुष्याचा देऊ त्या दोरीला आधार विश्वासाचा छोटया - मोठ्या अनुभवांवरून अनुभव घेऊ जीवनाचा गाऊ जीवन गाणं घेऊन आधार अनुभवांचा ----------- संध्या गडगे - सिन्नरकर