आधार
आधार
खोड, फांदया , फळे अन फुले
आकार केवढा हा वृक्षाचा
बीज हे मात्र एकच असतं
आधार या सर्वांचा
नात्या - नात्यांतून राहतात
उभ्या चार भिंती
पण भिंतींना आधार असते
घरातील मोठी व्यक्ती
नदया - नाले वाहतात
घेऊन किरण आशेचा
अन विशाल समुद्र बनतो
आधार या सर्वांचा
असला जरीही आपल्याला
आधार सर्वांच्या प्रेमाचा
सगळ्यात वेगळा आधार
असतो फक्त मायेचा
रंगी - बेरंगी नात्यांनी
बनतो धागा आयुष्याचा
देऊ त्या दोरीला
आधार विश्वासाचा
छोटया - मोठ्या अनुभवांवरून
अनुभव घेऊ जीवनाचा
गाऊ जीवन गाणं
घेऊन आधार अनुभवांचा
----------- संध्या गडगे - सिन्नरकर
खोड, फांदया , फळे अन फुले
आकार केवढा हा वृक्षाचा
बीज हे मात्र एकच असतं
आधार या सर्वांचा
नात्या - नात्यांतून राहतात
उभ्या चार भिंती
पण भिंतींना आधार असते
घरातील मोठी व्यक्ती
नदया - नाले वाहतात
घेऊन किरण आशेचा
अन विशाल समुद्र बनतो
आधार या सर्वांचा
असला जरीही आपल्याला
आधार सर्वांच्या प्रेमाचा
सगळ्यात वेगळा आधार
असतो फक्त मायेचा
रंगी - बेरंगी नात्यांनी
बनतो धागा आयुष्याचा
देऊ त्या दोरीला
आधार विश्वासाचा
छोटया - मोठ्या अनुभवांवरून
अनुभव घेऊ जीवनाचा
गाऊ जीवन गाणं
घेऊन आधार अनुभवांचा
----------- संध्या गडगे - सिन्नरकर
Comments
Post a Comment