"वेळ "

      "वेळ "


बघाना  वेळेलाही 

किती  रूपे  असतात 

प्रत्येक  गोष्टी  साठी 

वेळकाळ  ठरलेलेच  असतात 


वेळ  कधी येते 

सुखाच्या  रूपात 

तर  कधी  येते 

दुःखाच्या  रूपात 


असलं  जरी  वेळेचं 

महत्त्व  आयुष्यात 

तरीही  वेळेच्या  म्हणण्यानेच 

सगळ्या गोष्टी  घडतात 


कोणती  वेळ  कधी 

येईल सांगुनी 

थोडीशी  साथ  असतेच

नशिबाची  म्हणुनी 


आपण  कितीही 

जरी  कष्ट  केले 

वेळच  देते  त्याचे 

फळ  ते  सारे 


थांबत  नाही  वेळ 

कधीही  कोणासाठी 

म्हणूनच  बंधन  तिला

नसतं  कोणाचही 


निघून  गेलेली  वेळ 

देते फक्त आठवणी 

रंगी-बेरंगी अन् 

निरनिराळ्या  साठवणी 

            ---------संध्या  गडगे - सिन्नरकर 

Comments

Popular posts from this blog

कोड आयुष्याचं

वेडे मन

सांत्वन ......