"झळ "
"झळ "
भर उन्हात पालवी फुटते
त्या झाडांना म्हणावं तरी काय ?
रखरखत्या उन्हात सावली देतात
जशी काळजी घेते आपली माय
स्वतः उन्हात उभे राहून
देतात सर्वांना सावली
उन्हाच्या त्या झळा सोसत
जशी राबते आपली माउली
सावलीचा त्या आधार घेता
मिळतो कसा थंडावा
आईच्या कुशीत जाता
मिळतो जसा गारवा
हिरव्यागार त्या झाडांशी
जसे खेळतात गार वारे
इवल्याश्या त्या पिल्लांची
जशी काळजी घेतात पाखरे
प्रखर त्या किरणांमधे
झाडे राहतात उभी खंबीर
चढाओढीच्या ह्या जीवनात
जसा आई देते धीर
सारे काही सहन करून
जशी फुलतात फुले
कळीरूप जीवन फुलवायचे कसे
हे तिच्याकडूनच कळले.
------ संध्या गडगे -सिन्नरकर
Comments
Post a Comment