"गुंफण"
एक दिवस सुख - दुःखांच्या
अश्रूंची करून साठवण
गुंफल्या त्याच्या माळा
ओवुनी धाग्यांत आठवण
माळेच्या त्या मोत्यांचे
रंग आगळे -वेगळे
कितीही अश्रूंनी ते
कधीच नाही विरघळले
सुखाच्या मोत्यांचा मोरपंखी
रंग कसा बळकट
अन दुःखाच्या मोत्यांचा
रंग कसा फिक्कट
रंगीत मोत्यांमुळेच
बेरंगी मोती दिसतात
बेरंगी मोत्यांमुळेच तर
रंगीत मोती उठून दिसतात
आठवणींच्या धाग्यांना
मोत्यांमुळेच अर्थ आला
आठवणींच्या धाग्यांमुळेच
मोत्यांचा साज गुंफला !!!!!
----- संध्या गडगे - सिन्नरकर
Comments
Post a Comment