☺आठवण ☺

☺आठवण ☺

विसरलीस तू  मला 
तरीही  मी  नाही  तुला  विसरणार 
ढगातून  येणाऱ्या  पावसाच्या  धारा 
पाहायचं  मी  नाही सोडणार.......  


नाही  आली  माझी  आठवण  तरीही  चालेल 
पण  तुझी  आठवण  काढायला  मी  नाही  विसरणार 
मुसळधार त्या  अमृतधारांमध्ये 
भिजण्याचं  मी  नाही  सोडणार ....... 


नाही  माझ्या  सुखात  सामील  झालीस  तरीही  चालेल 
पण  तुझ्या  सुखात  सामील  होण्याचं  मी  नाही  सोडणार 
माझा तो आनंद  पावसात  जाऊन  
व्यक्त  करण्याचं  मी नाही  सोडणार.......  


नाही  माझ्या  दुःखात  सामील  झालीस  तरीही  चालेल 
पण  तुझ्या  दुःखात  सामील  होण्याचं  मी  नाही  सोडणार 
माझे  ते  अश्रू  पावसाच्या  धारांमध्ये 
लपवण्याचं  मी  नाही  सोडणार ...... 


विसरलीस  माझा  चेहरा  तरीही  चालेल 
पण  मी  तुझा  चेहरा  नाही  विसरणार 
पावसात  भिजत  असताना  डोळे  बंद  करून 
तुझा  चेहरा  आठवण्याचे  मी  नाही  सोडणार ...... 


विसरलीस  माझ  नाव   तरीही  चालेल 
पण  मी  तुझे  नाव  नाही  विसरणार 
तुझे  नाव  त्या  पावसाला  जाऊन 
ऐकवण्याचे  मी  नाही  सोडणार ...... 


नाही  माझ्यासाठी  कधी  गाणी  गुणगुणलीस  तरीही  चालेल 
पण  मी  तुझ्यासाठी  गाणी  गुणगुणण्याचे  नाही  सोडणार 
माझं  ते  गाणं  पावसाला  जाऊन 
 ऐकवण्याचे  मी  नाही  सोडणार ....... 
                     .......संध्या  गडगे -सिन्नरकर 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कोड आयुष्याचं

वेडे मन

सांत्वन ......