☺दाता - परमेश्वर ☺
तूच आहेस सखा
तूच आहेस सर्वस्व
तुझ्यामध्येच सामावलेलं
आहे प्रत्येकाचं विश्व
कोणास कसा जन्म दयायचा
हे आहे तुझ्याच हाती
त्यातूनच निर्माण झाली
आगळी-वेगळी नाती
म्हणतात जन्माला येतानाच
नशीब सोबत येतं
जगी सर्वकाही हे
तुझ्या म्हणण्याप्रमाणेच घडतं
प्रत्येकाला देताना तू दिलंस
मन किती छान
पण आजच्या युगात काहींना
राहिलं नाही त्याचं भान
माणसाला तू दिलंस
मधुर असं मुख
मुक्या प्राण्यांमध्ये आहे
त्यांच्याहून जास्त सुख
कधी कधी शिणून
जीव होतो अगदी नकोसा
आयुष्य निर्माण करण्याचा
तुझा न्याय आहे तरी कसा
मांडला कसा परमेश्वरा
हा खेळ आयुष्याचा
कोणाला कधी बाद करायचं
हा निर्णय आहे आहे तुझा
कोणाला कुठवर चालवायचं
हे आहे तुझ्याच हाती
पण चुकीच्या वागण्यातून काहीजण
करून घेतात आपलीच माती
तू कोण कसा आहेस
कोणास ठाऊक नाही
कुणी तुला मानत
तर कुणी मानत नाही
हृदयात करुनी हे
परमेश्वरा मंदिर तुझे
जीवन जगू आनंदाने
देणे आहे तुझे
------ संध्या गडगे - सिन्नरकर
Comments
Post a Comment