☺ मैत्री ☺
☺ मैत्री ☺
म्हणतात मैत्रीच नातं
असतं सर्वात महान
पण वाटतंय आता ओसाड
झालंय माळरान
खुप नाजुक असतं
हे बंधन विश्वासाचं
पाण्यासारखं नितळ नातं
असतं दोन जीवांच
निभवन अन टिकवण असतं खुप भयान......
वाटतंय आता ओसाड झालंय माळरान........
सुख - दुःख सांगण्यास
होती एक सोबत
जशी आयुष्याच्या वाटेवर
होती एक परिपूर्ण संगत
पण , का झाली मग मन अशी गुमान........
वाटतंय आता ओसाड झालंय माळरान........
आयुष्याच्या एकेकाळी
त्याच माळरानी
कळया होत्या फुलत
झाडे होती झूलत
पाखरांची किलबिल ऐकत होते हे कान........
वाटतंय आता ओसाड झालंय माळरान........
आठवण आल्यावर मन
होतं कसं उदास
जुन्या आठवणी रंगल्यावर
होतात आता भास
हरवून गेली आहे आता आमच्या मैत्रीची शान.........
वाटतंय आता ओसाड झालंय माळरान........
दिवस ते आठवता
पणावतात हे नेत्र
दिवसासुद्धा डोळ्यांसमोर
दिसते कशी रात्र
सर्वगुणी हे नातं सुद्धा असतं का पाषाण.........
वाटतंय आता ओसाड झालंय माळरान........
मैत्रीच्या या नात्यात
एकमेकांवर पाहिजे एवढा विश्वास
कोणत्याही कारणामुळे कधी
नको निर्माण व्हायला अविश्वास
शेवट पर्यंत नातं टिकावं खुप छान
वाटायलाच नको कधी ओसाड झालाय माळरान...........☺
मैत्री होता एकमेकांशी
व्हावी अशी गट्टी
कधीही न मिळावी
तिला निमित्तमात्र सुट्टी
टिकावा एकमेकांवरचा मैत्रीचा अभिमान
वाटायलाच नको कधी ओसाड झालंय माळरान............
शेवटपर्यंत माझं मन
त्या मैत्रीवाचून असंच राहिल का झुरत ?
सुकलेली पाने - फुले
पुन्हा नाही का फुलत ?
वाटे आता मनाला सुटला आहे बाण............
फुलेलं का कधी हे मैत्रीचे ओसाड माळरान ????☺☺☺☺☺
Khup chan madam
ReplyDeleteapratim...agadi manala bhidanari kavita.....
ReplyDelete