हळवे मन
हळवे मन
मन हे माझे हळवे झाले
काय करावे समजेना ?
हळव्या माझ्या मनाला
काय करावे उमजेना ?
परमेश्वराची काय ही दृष्टी
बनवली ही सुंदर सृष्टी
फळे - फुले अन किलबिल पाखरे
रंगीबेरंगी ती फुलपाखरे
निसर्गरम्य त्या दुनियेचा अर्थ मला कळेना ?
वर्षातील हे तीन ऋतू
उन्हाळा , पावसाळा अन हिवाळा
चातक पक्षाची ती प्रतीक्षा
अन कोकीळ पक्षाचा तो मंजुळ गळा
पाखरांच्या त्या गुणगुणण्याचा अर्थ मला कळेना ?
सूर्याची ती प्रखर किरणं
अन चंद्राचं ते शितल असणं
आकाशाचं विराट दिसणं
अन नभी चमचमतं चांदणं
प्रखर अन शितल किरणांचा अर्थ मला कळेना ?
अफाट या सृष्टीची काया
अवाढव्य त्या वृक्षाची छाया
इवल्याशा पिलाच्या चोचीतील दाणा
अन मुक्या पशु -पक्षांची माया
मुक्या जीवांच्या जगण्याचा अर्थ मला कळेना ?
नाट्यरूपी हे क्षणभर जीवन
प्रत्येकजण जगती आपले आपण
जीवनाच्या वाटेवर कोणाला मिळे कधी सुख
तर दुःखी होते कधी कोणाचे मन
सुख - दुःखाच्या या धाग्यांचा अर्थ मला कळेना ?
प्रत्येकाच्या जीवनाची दोरी
आहे त्या परमेश्वराच्या हाती
जोपर्यंत आहे त्याच्या हाती
तोपर्यंत जगायची आगळी - वेगळी नाती
मानवरूपी जीवनाच्या कथेचा अर्थ मला कळेना ?
----- संध्या गडगे - सिन्नरकर
मन हे माझे हळवे झाले
काय करावे समजेना ?
हळव्या माझ्या मनाला
काय करावे उमजेना ?
परमेश्वराची काय ही दृष्टी
बनवली ही सुंदर सृष्टी
फळे - फुले अन किलबिल पाखरे
रंगीबेरंगी ती फुलपाखरे
निसर्गरम्य त्या दुनियेचा अर्थ मला कळेना ?
वर्षातील हे तीन ऋतू
उन्हाळा , पावसाळा अन हिवाळा
चातक पक्षाची ती प्रतीक्षा
अन कोकीळ पक्षाचा तो मंजुळ गळा
पाखरांच्या त्या गुणगुणण्याचा अर्थ मला कळेना ?
सूर्याची ती प्रखर किरणं
अन चंद्राचं ते शितल असणं
आकाशाचं विराट दिसणं
अन नभी चमचमतं चांदणं
प्रखर अन शितल किरणांचा अर्थ मला कळेना ?
अफाट या सृष्टीची काया
अवाढव्य त्या वृक्षाची छाया
इवल्याशा पिलाच्या चोचीतील दाणा
अन मुक्या पशु -पक्षांची माया
मुक्या जीवांच्या जगण्याचा अर्थ मला कळेना ?
नाट्यरूपी हे क्षणभर जीवन
प्रत्येकजण जगती आपले आपण
जीवनाच्या वाटेवर कोणाला मिळे कधी सुख
तर दुःखी होते कधी कोणाचे मन
सुख - दुःखाच्या या धाग्यांचा अर्थ मला कळेना ?
प्रत्येकाच्या जीवनाची दोरी
आहे त्या परमेश्वराच्या हाती
जोपर्यंत आहे त्याच्या हाती
तोपर्यंत जगायची आगळी - वेगळी नाती
मानवरूपी जीवनाच्या कथेचा अर्थ मला कळेना ?
----- संध्या गडगे - सिन्नरकर
Nice madam
ReplyDelete